कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध करण्याच्या मुद्द्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयात आज पुन्हा खटखट झाली. बेड शिल्लक नसल्याचे तुणतुणे खाजगी रुग्णालयांनी वाजविताच जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर रुग्णांना प्राधान्याने बेड उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश दिले.
कोरोना संसर्गात बाधित रुग्णांमध्ये लक्षणे नसलेल्या तसेच विशेष त्रास नसणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत असून अशा रुग्णांवर कोवीड केअर सेंटरमध्ये यशस्वीपणे उपचार केले जात आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, उपायुक्त वर्षा ठाकूर, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर यांच्यासह खाजगी रुग्णालयांचे डॉक्टर्स, अधिकारी उपस्थित होते.
शहरात पॉझिटिव रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने आता हा खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढली आहे अशावेळी खंबीर रुग्णांना प्राधान्याने बेड उपलब्ध करून देण्याची जबाबदारी रुग्णालयांची असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले त्याच बरोबर रुग्ण दाखल होता क्षणी तातडीने उपचार सुरू करण्यात यावेत रुग्णालयांनी आपले आयसीयु बेड, व इतर सुविधा गंभीर रुग्णांना प्राधान्याने उपलब्ध होतील, याची खबरदारी घ्यावी. त्यासाठी लक्षणे दिसून येत नसलेल्या कोरोना बाधित ज्या रुग्णांना विशेष त्रास नाही.अशा रुग्णांची व्यवस्थित तपासणी करावी. ज्या रुग्णांची तब्बेत कोवीड केअर सेंटरमधील उपचाराने चांगली होऊ शकते, अशा प्रकरणात त्या रुग्णांना सीसीसीमध्ये पाठवावे. तसेच जर त्या रुग्णांना होम क्वारंटाईन व्हायचे असेल आणि त्यांच्याकडे नियमानुसार आवश्यक सुविधा असेल तर मनपा आयुक्त यांच्या मान्यतेने त्या रुग्णालयाने आपल्या देखरेखेखाली होम क्वारंटाईन करावे. सर्व मोठ्या रुग्णालयांसह लहान रुग्णालये जिथे २०-३० खाटांची सुविधा उपलब्ध असून कोरोना रुग्णांवर उपचार केल्या जात आहेत. त्या सर्वांनी आपल्या रुग्णालयातील खाटा ऑक्सीजन खाटा करुन घ्याव्यात. ऑक्सीजन उपलब्धतेचे प्रमाण वाढवावे. कोरोना बाधित रुग्णांना दाखल करण्यापर्यंतच्या कालावधीत किंवा खाटा उपलब्ध नसतील तर अशा स्थितीत दूसरीकडे पाठवण्याआधी रुग्णांवर आवश्यक उपचार करणे, तब्बेतीत स्थिरता आणणे शक्य होईल. आयसीयु व्हेंटीलेटर, ऑक्सीजनसह इतर आवश्यक सुविधा औषधसाठा पूरक साहित्य यांच्या उपलब्धतेमध्ये वाढ करावी. तसेच यासाठी आकारण्यात येणाऱ्या दरांमध्ये एक निश्चित सुसुत्रता ठेवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी चौधरी यांनी यावेळी दिल्या.











